........म्हणे भाजपच्या लसी वर माझा विश्वास नसल्याने मी लस घेणार नाही.......!
नवी दिल्ली दि.२ - जगभर थैमान घातलेला कोरोना व्हायरस आता कुठे आटोक्यात आला आहे. सर्व नागरिक कोरोना लसीची वाट पाहत आहेत. मात्र समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव कोरोना लसीबाबत अजब वक्तव्य केलं आहे.
मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू?, जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही, असं अखिलेश यादव यादव यांनी म्हटलं आहे. एकीकडे केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून इतरही लसींवर काम चालू आहे. त्यामुळे यादवांच्या वक्तव्यावरून अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
बातमी शेअर करा