Advertisement

निवडणूक आयोगाच्या ताशेर्‍यानंतर अखेर पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

प्रजापत्र | Saturday, 24/02/2024
बातमी शेअर करा

बीड दि.24 (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे होते.ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि जे निवडणूक विभागाशी थेट संबंधित  येतात त्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.हे करत असताना राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक विभागाच्या नियमावलीला धाब्यावर बसवित अधिकार्‍यांनी मूळ परिपत्रकाला बाजूला सारत आपली  मनमानी अनेक ठिकाणी दाखविली होती.मात्र यावर आक्षेप घेतल्यानंतर अखेर राज्यात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरु झाले आणि आता यात बीड जिल्ह्यातील राणी पाराजी सानप (बीडवरून धाराशिव), भास्कर शंकर कांबळे(बीडवरून धाराशिव), तुकाराम रघुनाथ बोडखे (बीडहून धाराशिव), शिवशंकर बळीराम चोपणे (बीडवरून धाराशिव), देविदास बाजीराव आवारे (बीडवरून धाराशिव), ज्ञानेश्‍वर दत्तात्रय राडकर(बीडवरून छ.संभाजी नगर ग्रा.), चेतन वसंतराव ओगले(बीडवरून छ. संभाजीनगर  ग्रा.), भागवतराव विश्‍वजीत फरतडे(बीडवरून छ. संभाजीनगर ग्रा.), उत्तम संभाजी नागरगोजे (बीडवरून छ.  संभाजीनगर ग्रा.) या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्यासाठी एक परिपत्रक जारी केलेले आहे.त्या परिपत्रकानुसार बदल्या अपेक्षित असतात.मात्र अनेक ठिकाणी त्या परिपत्रकाला बगल देऊन आपल्या सोईनुसार बदल्यासाठी नवीन परिपत्रक वरिष्ठ पातळीवरून काढले जातात.त्यानुसार राज्यात अनेक अधिकार्‍यांना बदलीपासून अभय मिळते.याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार गेल्यानंतर याची दखल महाराष्ट्र प्रशासनिक लवाद (मॅट) आणि आयोगानेही घेतली आहे. आयोगाने याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मागविला आहे. राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्वतः यात लक्ष घालून ताशेरे ओढले होते.त्यानुसार पुन्हा एकदा पोलीस दलात अधिकार्‍यांची नावे नव्याने पाठविण्यात आली.त्यानुसार बीड जिल्ह्यातून 9 अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून छत्रपती संभाजी नगर ग्रामीण मधून देवीदास बाबुअप्पा खांडकुळे, योगेश गोविंद पवार, स्वाती नाना लहाणे, प्रभाकर आसाराम मुंजाळ, संजय मुरलीधर धुमाळ हे बीडला आले आहेत. तर धाराशिववरून बसवेश्‍वर रामचंद्र चेनशेट्टी, रमाकांत मोहनराव शिंदे, भागवत यशवंत गाडे, सुकुमार गणपत बनसोडे, अनघा अंकुश गोडगे, शिवाजी रणबाग सर्जे, रियाज करिमखान पटेल, पल्लवी संजय पवार बीडला आले आहेत. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी बदलीसाठी नावे देताना खबरदारी घेतली आहे पण यात आता एखाद्या अधिकार्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असेल तर आता थेट निवडणूक विभाग त्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाईसाठी पाऊल उचलणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

Advertisement