Advertisement

बीडकरांचा प्रवास होणार स्वस्तात

प्रजापत्र | Friday, 23/02/2024
बातमी शेअर करा

एसटी बससह इतर वाहनांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ आणि वाढत्या इंधन खर्चामुळे राज्य परिवहन महामंडळाने सन २०२४ अखेरीस ५ हजार पर्यावरणपूरक बस ताफ्यात दाखल करीत आहे. यापैकी बीड विभागासाठी देखील पहिल्या टप्यात म्हणजेच एप्रिलपर्यंत ५५ बस दाखल होणार आहेत. 

 

 

शासनाकडून विविध योजनांद्वारे प्रवाशांना वाहतूक दरात सवलत दिली जात आहे. वाढता इंधन खर्च व पर्यावरणपूरक प्रवासासाठी बीड विभागातील ८ आगारांसाठी दोन टप्प्यांत १८२ शिवाई बस दाखल होणार असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.दरम्यान अत्याधुनिक यंत्रणा असलेली ही इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर ३५० ते ३६० किलोमीटरपर्यंत धावणार आहे. यामुळे दिवसातून केवळ एकदा बस चार्ज करावी लागणार आहे. तसेच प्रतितास १२० किलाेमीटर अशी बसची धाव असणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तिकीटाचे दर आत्तापेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्या मार्गावर जास्त वाहतूक आहे, त्या मार्गावर बस सेवा देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, माजलगाव आगारामध्ये सर्वात अगोदर पर्यावरणपूरक बस सुविधा उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement