अंबाजोगाई- दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुकसक्या आवळण्यात आल्या. आहे ही कारवाई 'आयपीएस' कमलेश मीना यांच्या पथकाने केली.याप्रकारणी ७ जणांना पकडून त्यांच्याकडील गावठी कट्टा ,पाच जिवंत काडतूस,लोखंडी रॉडसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि, अंबाजोगाईहून नेकनूर कडे दरोड्याच्या तयारीत निघालेल्या सात जणांच्या टोळीला सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मिना यांच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक आरोपींमधील एक जण शिवजयंती समितीचा अध्यक्ष राहिलेला आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मिना यांना दरोड्याच्या तयारितील टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमलेश मिना यांच्या पथकाने केज अंबाजोगाई रस्त्यावर सापळा लावून एका मेडीकल समोर इरिटिका गाडी अडवली. यात सात जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून एक देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अटक आरोपींमध्ये गणेश भोसले, हरिश देवडा, नारायण करण, श्रीनिवास बारगम,श्रावण गायकवाड, दिपक चाटे, नामदेव पोवार यांचा समावेश आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ माजली आहे.यातील गणेश भोसले अंबाजोगाई शिवजयंती उत्सव समितीचा अध्यक्ष आहे.