नेकनूर- मांजरसुंबा घाटातून जाणार्या स्कॉर्पिओमध्ये गांजा असल्याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी या गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात नऊ किलो गांजा आढळून आला. गांज्याची किंमत १ लाख १४ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांज्यासह गाडी जप्त केली.
बीड ते मांजरसुंबा मार्गे जामखेडला निघालेली स्कॉर्पिओ क्र. एम.एच. १२ आर.एन. ६५७२ या गाडीत गांजा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात नऊ किलो गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत १ लाख १४ हजार रुपये आहे. गांजासह स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली. एकूण मुद्देमालाची किंमत ८ लाख १४ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर बबन काळकुटे (रा. अंतरवली टोबी घनसांगवी जि. जालना), प्रदीप जगदाळे (रा. आष्टी) व दादा चव्हाण (रा. जामखेड) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोस्वामी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घुले, सचीन मुरुमकर, मुकुंद ढाकणे, होमगार्ड जाधव, होमगार्ड सय्यद इम्रान यांनी केली आहे. पुढील तपास चंद्रकांत गोस्वामी हे करत आहेत.