बीड दि.31 (डी. डी. बनसोडे) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. परंतू आता या लोकांसाठी केंद्र सरकारनं नोदंणीकृत उद्योगामधील कामगारांना राज्य कामगार विमा योजनेच्या अंतर्गत आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आयटीसह अन्य उद्योगांमधील कामगारांचा समावेश करण्यात आला आहे.
23 मार्च ते 31 डिसेंबर या कालावधील नोकरी गेलेल्या संघटीत उद्योगातील कामगरांसाठी राज्य कामगार विमा आयुक्तालयातर्फे अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांच्या पगारातील 50 टक्के रक्कम दिली जाणार आहे.
पुणे, नाशिक, मरोळ, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई या सहा विभागाअंतर्गत आतापर्यंत 13 हजारांहून अधिक कामगारांनी या योजने अर्ज केले आहेत. यामध्ये मुंबईतून सहाशेवर तर पुण्यातून दीड हजाराहून अधिक अर्ज केले आहेत
दरम्यान, पुणे विभागातील 334 कामगरांना आतापर्यंत 41 लाख 58 हजार रुपये वितरित केले आहेत. तसेच दिवसेंदिवस अर्जदारांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.