किल्लेधारूर दि.२५(प्रतिनिधी)-ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक बसलेल्या सीटाखाली साप निघाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून टॅक्टर पलटी झाले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर केज रोडवर घडली.बळीराम रघुनाथ नाईकवाडे (वय-२७ वर्षे रा.घागरवाडा) असे मयत चालकाचे नाव आहे.
तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे स्वतःचा ऊस ट्रॅक्टरच्या माध्यमातून येडेश्वरी कारखान्यास घेऊन जाण्यात येत होता.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हजारी पेट्रोल पंपाजवळ चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला.साप दिसतात चालक गोंधळून गेल्यामुळे त्याचा स्टेरिंगवरील ताबा सुटला.यावेळी ऊसासह ट्रॅक्टर पलटी झाला.चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर हेड पडले.यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.या अपघातात चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यु झाला.यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना साप दिसल्यानंतर त्यास ठार मारले.दरम्यान अपघातामुळे ऊस रस्त्यावर पडला होता.पोलिसांनी पंचनामा करून वाहतुकीला अडथळा येत असल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला केले.चालकाची नंतर उत्तरीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आले होते.
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/57235004-38bc-4aba-a85d-b21189fda107.jpg?itok=15vpE5Vw)
प्रजापत्र | Thursday, 25/01/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा