Advertisement

बीड शहरातील कर्फ्यूमुळे खते आणि बियाणांच्या पुरवठ्याला ब्रेक

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक  म्हणून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण बीड शहर कंटेनमेंट झोन जाहीर करत बीड शहरात ४ जून पर्यंत कर्फ्यू लावला आहे. मात्र आता याचा मोठा फटका खते आणि बियाणांच्या पुरवठ्याच्या बसू लागला असून जिल्ह्यातील खरीप हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. 
बीड हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. जिल्हाभरात लागणारा  ७० % खते आणि बियाणांचा पुरवठा बीड शहरातून होतो. जवळपास सर्व ठोक विक्रेते बीड शहरात आहेत. मात्र दोन दिवसांपासून बीड शार कर्फ्युमध्ये आहे. त्यामुळे खते आणि बियाणांचा पुरवठाच थांबला आहे. कृषी निविष्ठां ही खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक बाब आहे. मात्र बीड शहरात कंटेनमेंट झोन केल्याने ठोक विक्रेत्यांची दुकाने देखील उघडलेली नाहीत. या व्यापाऱ्यांचा माळ परराज्यातून तो, त्या मालाची वाहने बीड शहराच्या बाहेर उभी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रशासन त्या वाहनांना बीड शहरात प्रवेश देत नाही, दुसरीकडे तालुक्यांच्या ठिकाणी खते बियाणे पाठविण्याची यंत्रणा देखील ठप्प पडली आहे. त्यामुळे जर तालुक्यांच्या ठिकाणी खते बियाणे गेली नाहीत, किंवा ठोक विक्रेत्यांना माल उतरवताच आला नाही तर शेतकऱ्यांनी खरेदी कोठून करायची हा प्रश्न आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील खरीप हंगामावर याचा परिणाम होणार आहे. 
---
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना किमान परराज्यातून आलेला माल उतरवून घेऊ द्या आणि इतर तालुक्यांच्या ठिकाणी माल पाठवू द्या, आम्ही शारीरिक अंतराचे पालन करतो, तसेच ठोक विक्रेत्यांकडे शेतकऱ्यांच्या थेट रांगा लागत नाहीत , याचा विचार करा अशी विनंती केली आहे,मात्र आम्हाला अद्याप प्रशासनाकडून उत्तर मिळालेले नाही असे कृषी साहित्य विक्रेता असोशिएशनचे सत्यनारायण कासट यांनी म्हटले आहे. 
----
तालुकास्तरावर देखील होणार परिणाम 
बीड शहरासोबतच पाटोदा आणि धारौर ही तालुका मुख्यालये असणारी शहरे देखील कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील कोटिकंग दुकाने उघडणार नाहीत. मग या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी साहित्याची खरेदी कोठून करायची हा प्रश्न आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Advertisement

Advertisement