आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचाच कालावधील शिल्लक उरला आहे. मे महिन्याच्या अखेरीस भारतात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाबाबत आमची बैठक होमार असून २५ जानेवारीपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली.
महाराष्ट्रात जागावाटपाचा कसा असेल फॉर्म्युला?
इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.