सोलापूर- शहापूर तालुक्यात आदिवासी पदे असून येथे असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अनेकदा मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने आज विद्यार्थ्यांनी बकऱ्या चारत शिक्षकांची मागणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी गाव पाड्यात शाळा आहे. मात्र शिक्षक अपुरे असल्याने शाळेत एक शिक्षकाची नेमणूक केली आहे. पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षक शिकवतो. शाळेला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. पण काही वेळा शिक्षकाला कामानिमित्ताने बाहेर जावे लागले, तर शाळाच बंद असते. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. मुले शिक्षणात मागे राहातात.
शिक्षक मिळावेत यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून शहापूर पंचायत समिती समोर बकऱ्या घेऊन जात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा भरवून आंदोलन केले. येथेच विद्यार्थ्यांनी शाळा भरविली आहे.