अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठयांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर टिकणार नाही असं सांगत मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीवर नरेंद्र पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
नरेंद्र पाटील यांनी पणजोबा पर्यंतच्या नोंदी सापडल्या नाही तर आरक्षण टिकणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले न टाकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका, न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती-जातीत संघर्ष उदभवेल आणि त्याचे परिणाम वाईट होईल असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी नाव न घेता मनाेज जरांगे पाटील यांना दिला.
प्रकाश शेंडगे यांनी धनगर समाज मेंढरं आणि गाढवापुरता मर्यादित ठेवला आणि स्वतः उद्योगपती बनले अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी थेट शेंडगे यांचं नाव घेऊन केली. शेंडगे यांच्या मुंबईत मेंढरं सोडण्याच्या इशाऱ्यावर नरेंद्र पाटील यांनी हात जोडत त्यांचा खरपूस समाचार घेतला.