Advertisement

  ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यभरात पेट्रोल-डिझेलचे संकट 

प्रजापत्र | Tuesday, 02/01/2024
बातमी शेअर करा

बीड- केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं राज्यातील अनेक भागातील पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

 

तसेच बीड जिल्ह्यातहि टँकर चालकांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल
पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने, बीड मधील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत. यामुळे आता वाहनधारकांसह दुचाकी धारकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे वाहनधारकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. 

Advertisement

Advertisement