Advertisement

बीडमध्ये ट्रक,टेम्पो चालक रस्त्यावर

प्रजापत्र | Monday, 01/01/2024
बातमी शेअर करा

बीड- केंद्र सरकारने चालका संदर्भातला चुकीचा कायदा पास केला आहे. या कायद्यामुळे चालकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, या मागणीसाठी आज मोटर मालक-चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान कायद्यात बदल न केल्यास चक्काजाम करण्याचा इशारा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष काकडे यांनी दिला आहे.

  केंद्र सरकारच्या वतीने २३ डिसेंबर रोजी चालकासंदर्भातला एक कायदा पास करण्यात आला. अपघात झाल्यानंतर चालकाला दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड असा कायदा पास झाला आहे. या कायद्यामुळे चालकाला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र सरकारने या कायद्यात बदल करावा, यासाठी आज चालक-मालक संघटनेच्या वतीने जालना रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शेकडो चालक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने कायद्यात बदल न केल्यास जिल्हाभरात चक्काजाम करण्याचा इशारा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement