Advertisement

 शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय पुन्हा लांबणीवर

प्रजापत्र | Thursday, 14/12/2023
बातमी शेअर करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही ही सुनावणी सुरू आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची नियमित सुनावणी घेऊन साक्ष संपली आहे. आता सोमवारपासून 3 दिवस अंतिम सुनावणी आहे. मात्र याचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात २ लाख पानांचे कागदपत्रे तयार झाली आहेत. ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे ६ निकाल लागणार आहेत. २१ ते ३१ डिसेंबरपर्यंत या निकालाचे लेखन अशक्य आहे. त्यामुळे विधीमंडळाकडून वेळ मागवून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Advertisement

Advertisement