Advertisement

आता एसटीतील प्रवास आणखी होणार सुलभ

प्रजापत्र | Tuesday, 12/12/2023
बातमी शेअर करा

बीड दि.१२ (प्रतिनिधी)-सामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसमधील प्रवास आता आणखी सुलभ झाला आहे.राज्य परिवहन महामंडळाने आता प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन प्रणाली विकसित केली आहे.बसमधून प्रवास करणाऱ्यांना तिकिटासाठी अनेकदा चिल्लर पैसे सोबत ठेवावे लागत असायचे. कधीकधी सुट्ट्या पैशांमुळे वाद ही निर्माण होत असायचा.मात्र आता एसटी महामंडळाने युपीआय पेमेंटची सेवा सुरु केल्यामुळे प्रवाशांच्या चिल्लर पैशांसाठीची कटकट कायमस्वरूपी मिटणार असल्याचे चित्र आहे. विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बस आता 'हायटेक' होत असून प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटची सेवा सुरु केली.बीड जिल्ह्यातील सर्व बसेसमधून प्रवास करणाऱ्यांना आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपल्बध करण्यात आली आहे.

 

बसेसच्या वाहकांकडे ऑनलाईन पेमेंटसाठी क्यूआर कोड असणार आहे.त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करायचा अन लगेच आपल्याला बसच्या तिकिटाचे पैसे भरले की लगेच तिकिट मिळणार आहे.दरम्यान नव्या उपक्रमामुळे सुट्ट्या पैशांची कटकट पूर्णपणे मिटणार असून याला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

Advertisement