अहमदनगर- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही निर्यात बंदी वाढविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकरी आक्रमक झाले असून कांदा निर्यात बंदी उठवावी या मागनीसह अन्य मागण्यासाठी नगर- मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रामुख्याने कांदा निर्यात बंदी मागे घ्या, इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या. या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत महामार्ग अडवला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बातमी शेअर करा