Advertisement

पुढच्या आठवड्यात भारताला मिळणार कोरोनाची लस

प्रजापत्र | Saturday, 26/12/2020
बातमी शेअर करा

सिरमच्या लसीला मिळू शकते परवानगी 

दिल्ली :  कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अनेकजण धास्तावलेले असतानाच आता भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या आठवड्यात  म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत भारताला कोरोनाची लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. सिरमच्या कोव्हीशील्ड या लसीला भारतात परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत. भारताचे औषध नियंत्रक यासाठी इंग्लंडच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.
सिरम इंडिया या कंपनीने कोव्हीशील्ड लसीची सर्व माहिती भारताच्या औषध नियंत्रकांकडे दिली आहे. लसी संदर्भातील तज्ञांच्या समितीची  पुढील आठवड्यात होत आहे. तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डच्या लसीला येत्या दोन  दिवसात परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर लगेच भारतात सिरमच्या लसीला मंजुरी दिली जाईल.त्यामुळे सिरमची लस भारतातील पहिली कोरोना लस ठरणार आहे.   

Advertisement

Advertisement