सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.
देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही (आज) नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बातमी शेअर करा