परळी- मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. बीडच्या परळीत आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार आहे. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. परळीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि स्थानिक आमदार परळीत येणार आहेत. अशात मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे कार्यक्रमाला उपस्थित राहणार?
पंकजा मुंडे देखील शासन आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. तर देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल. तर भाजपच्या पोस्टर्सवरही पंकजा मुंडे यांचे फोटो दिसत आहे.
मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येणार?
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही जरी भावंडं असली तरी हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. 2019 ला धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून परळी विधानसभा निवडणूक लढवली. तर भाजपकडून पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या अटीतटीच्या लढाईत धनंजय मुंडे हे विजयी झाले. तर पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय लढाई ही अटीतटीची आहे. अशात आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला हजर राहिल्या तर मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही छुपा संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमात हजर राहिल्या तर भाजपचे हे दोन बडे नेतेदेखील एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे.