Advertisement

राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस

प्रजापत्र | Wednesday, 29/11/2023
बातमी शेअर करा

बीड- राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातल्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

  मराठवाड्यासह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. ज्वारी, कापूस, फळबागा आणि भाजीपाल्यांचं नुकसान झालं. शनिवारपासून राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. येत्या ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 

Advertisement

Advertisement