Advertisement

 अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

प्रजापत्र | Monday, 27/11/2023
बातमी शेअर करा

राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं आहे. या पावसाने शेतकऱ्यांना चांगलंच रडवलं आहे. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके मातीमोल झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या पावसानं शेतकऱ्यांना चांगलंच रडवलंय. याचदरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

 

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- मुख्यमंत्री शिंदे
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याचबरोबर राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळीग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

Advertisement

Advertisement