बीड- पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी वाळू माफियाच्याविरोधातील कारवाईची मोहिमेने आता चांगलाच वेग पकडला असून दोन दिवसापूर्वी गोदापात्रात पाऊण कोटींचा साठा जप्त केल्यानंतर आज सकाळी पुन्हा सहाच्या सुमारास चार हायवा, चार टिप्परसह १२० ब्रास वाळू साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दीड कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून गेवराई तहसीलदार घटनास्थळी आले आहेत.
पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पथकाला अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्यानंतर मागच्या दोन दिवसात पथकाने जुगार अड्डा आणि गोदापात्रातील वाळू माफियाना लक्ष करत साठा ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे. आज सकाळी ६ च्या सुमारास पथक प्रमुख गणेश मुंडे व चकलंबा पोलीस ठाण्याचे सपोनि नारायण शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी गुंतेगाव गोदापात्रात मोठी कारवाई केली आहे.चार हायवा, चार टिप्परसह १२० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.