बीड दि.21 (प्रतिनिधी): केज उपविभागात सहाय्यक पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असलेले परिविक्षाधिन आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांना अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षक पदावर नियूक्ती देण्यात आली आहे. परिविक्षाधिन अधिकारी असतांना पंकज कुमावत यांनी जिल्हाभरात आपल्या कार्यशैलीने दबदबा निर्माण केलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आता बीड जिल्ह्यातच पुर्णवेळ नियूक्ती मिळाली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात परिविक्षाधिन अधिकारी म्हणून आलेले आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे केज पोलीस उपविभागाचा पदभार देण्यात आला होता. मागच्या दीड वर्षाच्या काळात कुमावत यांनी या पदावरून जिल्हाभरात दबदबा निर्माण केला. अवैध धंद्यांसोबतच गुटखा, जनावरांची तस्करी यासह वाळू तस्करीवर त्यांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत. पंकज कुमावत यांनी जिल्हाभरात केलेल्या कारवायांमुळे त्यांच्या नावाची आजही अनेकांना धडकी भरते. या पार्श्वभूमीवर आता पंकज कुमावत यांना अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियूक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियूक्तीसंदर्भाने गृहविभागातील वरिष्ठांकडून दुजोरा मिळाला आहे.