Advertisement

दिंद्रुड महामार्गावर टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले

प्रजापत्र | Thursday, 24/12/2020
बातमी शेअर करा

दिंद्रुड-तेलगाव-दिंद्रुड महामार्गावर एका भरधाव वेगात आलेल्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.२४) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.हा टिप्पर राखेची वाहतूक करणार असून दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला होता.

बाबू आबाजी निरडे ( ५२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.  बाबु निरडे हे दुचाकीवरुन ( एम.एच.४४ ई ६४७४) आपल्या गावी कचारवाडीकडे परतत होते. याच दरम्यान, परळीकडून भरधाव वेगात येणाऱ्या राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ( एम एच २२ एए ५५४ ) नर्मदा जिनिंगजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार निरडे टिप्परच्या खाली चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर अनियंत्रित टिप्पर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला. यात लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे.अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह धारुर येथील शासकीय रुग्णालयात हलवला आहे. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

Advertisement

Advertisement