पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसमधील कधीकाळी टॉप दोन नेते असलेले शरद पवार आणि अजित पवार आता वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी वेगळी वाट धरली आहे. अजित पवार राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसोबत गेले. परंतु शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहिले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. त्यानंतर अजित पवार यांनीही उत्तर सभा घेतल्या. यामुळे एका कुटुंबातील असलेले हे दोन्ही नेते राज्यात चर्चेचा विषय ठरलेले असतात. शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व जण एकत्र आले.
का झाली सर्वांची एकत्र भेट
शरद पवार यांचे प्रतापराव पवार बंधू आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये गोविंदबाग येथे एकत्र येतात. यंदा प्रतापवराव यांच्या पत्नी प्रकृती बरी नसल्यामुळे बारामतीमध्ये येणार नाही. यामुळे ही संपूर्णपणे कौटुंबिक भेट शुक्रवारी झाली आहे.