Advertisement

 मंत्री दिलीप वळसे यांची शरद पवारांसोबत बैठक

प्रजापत्र | Friday, 10/11/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. यावेळी शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिलीप वळसे पाटील मंत्री झाले. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे म्हटले जात होते. पण राज्यातील जनतेने शरद पवार यांना कधीच बहुमत दिले नाही. त्यांना स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार यांच्यासारखे नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात,” असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते. आता दिलीप वळसे पाटील शुक्रवारी शरद पवार यांच्या भेटीला गेली. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात नियोजित बैठकीत दोघांची भेट झाली.

 

काय झाले बैठकीत
दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. या बैठकीत कुठली ही राजकीय चर्चा झाली नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या बदला संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल करण्यासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही. आपण पवार साहेबांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतो, असे दिलीप वळसे यांनी म्हटले. रयत शिक्षण संस्थेतील अनेक मुख्य पदांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे नेते अजूनही रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत आहे. यामुळे रयत शिक्षण संस्थेची कार्यकारणी बदलण्याची चर्चा होती. परंतु असे काहीच झाले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. शरद पवार यांची पाडवा भेट कधी घेणार, ते अजून ठरलेले नाही, असे त्यांनी म्हटले.

 

Advertisement

Advertisement