बीड-येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर काल रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना स्वतः येऊन कारवाई करावी लागली.चऱ्हाट फाट्यावर सुरु असलेल्या या अड्ड्याची माहिती कुमावत यांना मिळाली होती.यामध्ये २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या कारवाईत ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल तब्बल जप्त करण्यात आला.दरम्यान ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत कोणाच्या 'विश्वासा'ने हा जुगार अड्डा सुरु होता याबाबतच्या चर्चा आता रंगल्या आहेत.
तुकाराम नगरच्या पाठीमागे तांदळे यांच्या शेडमध्ये मागच्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरु होता. याबाबतची माहिती पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर सांयकाळी ७.३० वाजता छापा मारून १७ जणांना ताब्यात घेतले.हा अड्डा कोणाच्या आशीर्वादाने चालत होता आणि यातील आरोपी कोण-कोण आहेत याचा तपास सुरु असून २५ आरोपीवर सध्या पोलीस नाईक दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.