मुंबई : महाराष्ट्रातील बारचालक आणि रेस्तराँ यांच्यासंदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेस्तराँ आणि बारचालकाच्या परवाना शुल्कात ठाकरे सरकारने ५० टक्के कपात केली आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच लिकर इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता. कोविड काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानं बंद होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती.
लॉकडाउन काळात केलेल्या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे. राज्यशासनाने बारचालक आणि रेस्तराँ यांच्या परवाना शुल्कात कपात केली आहे. . ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे .
बातमी शेअर करा