राज्यासह देशात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता
आज महाराष्ट्रासह देशात पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.a
बातमी शेअर करा