Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

प्रजापत्र | Wednesday, 08/11/2023
बातमी शेअर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फडणवीस यांचा आजचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा महत्वाचा आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु, दोन्ही उपोषणावेळी फडणवीस एकदाही त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत. तर काही वेळा बोलताना मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर थेट टीकाही केली होती.मनोज जरांगे यांच्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रतिउत्तर दिले होते.

दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहे, याचवेळी आज फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आज फडणवीस येणार आहे. त्यामुळे आज ते जरांगे यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे .

 

देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला जाणार

छत्रपती संभाजीनगरमधील आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांचे तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement