Advertisement

पुढील पाच वर्षे ८० कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन 

प्रजापत्र | Saturday, 04/11/2023
बातमी शेअर करा

छत्तीसगडमधील दुर्ग येथे निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळत राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी ठरवले आहे की, भाजप सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मला असे पवित्र निर्णय घेण्यासाठी शक्ती देत आलं आहे.'

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतात. 30 जून 2020 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी ती पुढील पाच वर्षांसाठी लागू ठेवण्याबाबत बोलले आहे.  

काय आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना?

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना/पॅकेज हे गरिबांसाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे सर्वसमावेशक मदत पॅकेज आहे. मार्च 2020 मध्ये सर्वात गरीब लोकांपर्यंत अन्न आणि पैसे पोहोचवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती, जेणेकरून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यात अडचणी येऊ नयेत . 

 

Advertisement

Advertisement