Advertisement

मराठा आरक्षण मिळत नसल्याने दोघांनी उचलले टोकाचे पाऊल  

प्रजापत्र | Saturday, 04/11/2023
बातमी शेअर करा

बीड- मराठा आरक्षण मिळत नसल्याने दोन तरूणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. बीड तालुक्यातील कामखेडा येथे २२ वर्षीय तरूणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली तर बीड तालुक्यातीलच कोळवाडी येथील २६ वर्षीय तरूणाने गळफास लावून जिवन संपविले. या दोन्ही घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

  बीड तालुक्यातील कोळवाडी येथील अमोल रोहिदास नांदे (वय २६) या तरूणाने आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदरील घटनेची माहिती कळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत अमोल नांदे याचा मराठा आरक्षणासाठीच्या साखळी उपोषणात सक्रीय सहभाग होता. एवढे करूनही आरक्षण मिळत नसल्याने तो निराश झाला होता. त्यातुनच त्याने टोकाचे पाऊल उचल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

एका तरुणाने आज सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कामखेडा (ता.बीड) येथे घडली आहे. बीड तालुक्यातील कामखेडा येथील प्रेमराज

किशोर जमदाडे (वय २२) याने आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मराठा आरक्षणासाठी प्रेमराज याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणात दुपारी उशीरापर्यंत जवाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement