बीड-मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण अंतरवली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथे सुरू केलेले आहे. उपोषणादरम्यान त्यांची आज रोजी प्रकृती खालवली असल्याचे सूत्रांकडून समजलेले आहे.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्याने, व काही समाजकंटक मराठा समाजाच्या नावाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण आंदोलन भरकटावे आंदोलनास हिंसक वळण लागावे या दुषित हेतूने काही लोक मराठा आंदोलनाच्या नावावर जाळपोळ व हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी तसेच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये व शांततेच्या मार्गाने चाललेले मराठा आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे चालावे, या हेतूने मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्हा बंद ची हाक देऊन बंदला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन सदरचा बंद शांततेत लोकशाहीच्या मार्गाने यशस्वी करावा अशी मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने विनंती करण्यात आले आहे.
बंदच्या काळातील आचारसंहिता व नियमावली
बंदच्या काळात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये.शासकीय व खाजगी मालमत्तेस नुकसान पोहोचेल असे वर्तन करू नये.
कोणत्याही समाजाबद्दल महापुरुषांन बद्दल द्वेश निर्माण होईल असे वर्तन अथवा वक्तव्य करू नये.बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा वैद्यकीय सेवा यांना वगळण्यात आलेले आहे.बंदच्या काळात मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न करू नये.