आष्टी - आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला पहाटे अचानक तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली.या आगीत गाडीचे संपुर्ण नुकसान झाले आहे.जीप भस्मसात झाली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि नगराध्यक्ष जिया बेग यांनी तात्काळ भेट दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि.२९ आक्टोबर राञी नेहमीप्रमाणे आष्टी तहसिलदार यांचे जुन्या तहसिलदार निवास समोर लावण्यात आले.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक या गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती होताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधला पोलीस महसुल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी यांनी अग्नीशामक गाडीला पाचारण करुन ही आग विजविण्यासाठी प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली माञ तहसिलदार यांची गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे अंदोलन सुरू असून काल दि.२९ आक्टोबर रोजी जालन्याचे तहसिलदार छाया पवार यांची गाडी अंदोलकांनी फोडून आपला राग व्यक्त केला होता.माञ आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की,आग लागली ? याचा अजून तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तहसीलदार प्रमोद गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांची तातडीने धाव,अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.