शिरूर अनंतपाळ - तालुक्यातील उंबरदरा येथील रहिवाशी माजी सरपंच व्यंकटराव नरसिंग ढोपरे यांनी पुणे येथील इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे.ही आत्महत्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करत असल्याचे पत्र त्यांनी हस्तलिखित अक्षरांमध्ये लिहून ठेवलेले असून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उंबरदरा येथील रहिवासी असलेले व्यंकटराव ढोपरे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून काल पासून शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयासमोर शिरूर आनंतपाळ मराठा तालुका समन्वय समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ढोपरे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त मिळताच मराठा आरक्षण समिती शिरूर आनंतपाळ यांच्यावतीने साखळी उपोषणाच्या ठिकाणी ढोपरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.व तीव्र शब्दांमध्ये शासनाचा निषेध करण्यात आला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आणखीन किती बळी घेणार असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी या शोक सभेमध्ये व्यक्त केला .ढोपरे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून, उंबरदरा गावचे पाच वर्ष सरपंच पद त्यांनी भूषवलेले आहे. व सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायतचे उपसरपंच या पदावर ते कार्यरत होते. पुणे येथे त्यांचा मुलगा कंपनीमध्ये नोकरी करत असल्यामुळे त्या मुलाकडे राहण्यासाठी ते गेलेले होते अशी माहिती उंबरदारा ग्रामस्थांकडून मिळालेली आहे .आपण मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या करत आहोत. अशा प्रकारचे पत्र त्यांनी लिहून ठेवलेले आहे. ढोबळे यांच्या आत्महत्येमुळे तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट पसरलेली असून, शासनाच्या विरोधामध्ये तीव्र शब्दांमध्ये मराठा बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलेला असून यासंदर्भातली रणनीती पुढील काळात ठरवण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण तालुका समन्वय समितीच्या वतीने कळविण्यात येईल असे आवाहन करण्यात आलेले आहे.