मुंबई : भारत बायोटेकने स्वदेशी व्हॅक्सीन-कोव्हॅक्सिनच्या फेज-2 क्लीनिकल ट्रायल्सचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, ही व्हॅक्सीन कमीत-कमी 12 महिने कोरोनापासून रक्षण करेल. सर्वात महत्वाचे म्हणजेच, हे व्हॅक्सीन सर्व वयोगटातील महिला-पुरुषांवर तितकाच परिणाम करेल. सध्या व्हॅक्सीनचे फेज-3 ट्रायल्स सुरू आहेत. कंपनीने आपल्या व्हॅक्सीनसाठी ड्रग रेगुलेटरकडून इमरजंसी अप्रूव्हलची मागणी केली आहे.
एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीची व्हॅक्सीन-कोवीशील्डला डिसेंबरच्या अखेरपर्यंत इमरजंसी अप्रूव्हल मिळू शकते. यासाठी ड्रग रेगुलेटरच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने जो डेटा मागवला होता, तो भारतात व्हॅक्सीनचे ट्रायल्स करत असलेली पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ने जमा केला आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने भारत बायोटेककडूनही त्यांच्या व्हॅक्सीनसाठी देशभरात सुरू असलेल्या व्हॅक्सीनच्या फेज-3 ट्रायल्सचा डेटा मागवला आहे.दरम्यान, भारत बायोटेकने बुधवारी कोव्हॅक्सिन म्हणजेच BBV152 च्या फेज-2 चे निकाल जाहीर केले आहेत. यात बराच काळापर्यंत शरीरात अॅटीबॉडी आणि T-सेल मेमोरी रिस्पॉन्स दाखवला आहे. फेज-1 वॉलंटियर्सला व्हॅक्सीनेशनचे दुसरे डोज दिल्याच्या तीन महिन्यानंतर व्हॅक्सीन इफेक्टिव आढळली आहे. तर, फेज-2 ट्रायल्समध्ये व्हॅक्सीनने वाढलेला ह्युमरल आणि सेल-मीडियेटेड इम्यून रिस्पॉन्स दाखवला आहे.