नवी दिल्ली- पावसाळ्यानंतर (Rainy Season) देशातील अनेक भागांत थंडीला सुरुवात झाली आहे. तसेच, दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) पुढील दोन दिवस हलके धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
IMD नुसार, केरळमध्ये 23 आणि 24 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्ये 24 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD Weather Update) दिलेल्या माहितीनुसार, आज (21 ऑक्टोबर) रोजी दिल्लीत कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरणार आहे. शुक्रवारी दिल्ली-एनसीआरचे किमान तापमान 16 अंशांवर नोंदवले गेले आहे, जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) बद्दल बोलायचे तर, शुक्रवारी सकाळी AQI 260 ची नोंद झाली.