केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केलं आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचं वेळापत्रक चेक करता येईल. पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, UPSC सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.
UPSC परीक्षा २०२४ ची तारीख
यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024
यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 18 फेब्रुवारी 2024
यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई-2024: 10 मार्च, 2024
यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (I), 2024: 21 एप्रिल, 2024
यूपीएससी सीडीएस परीक्षा (I) 2024: 21 एप्रिल, 2024
यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024
यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2024: 26 मे, 2024
यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा, 2024: 21 जून, 2024
यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, 2024: 22 जून, 2024
यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 23 जून, 2024
यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: 7 जुलै, 2024
यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा, 2024: 14 जुलै, 2024
यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा, 2024: 4 ऑगस्ट 2024
यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024
यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय), 2024: 1 सप्टेंबर 2024
यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 20 सप्टेंबर 2024
यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2024: 24 नोव्हेंबर, 2024
यूपीएससी स्टेनोग्राफर (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी परीक्षा: 07 डिसेंबर