Advertisement

मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा

प्रजापत्र | Friday, 20/10/2023
बातमी शेअर करा

 

पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पु्न्हा एकदा मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ४० दिवसांचा अवधी दिला आहे, काही दिवसापूर्वी अंतरवली सराटी या गावात आरक्षणा संदर्भात मोठी सभाही झाली. या सभेत सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे अशी, मागणी जरांगे यांनी केली. दरम्यान, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत व्यक्त केलं. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. 

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांनी आज नारायण राणे यांच्या मतावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले. 'ज्या ठिकाणी मराठा समाज आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. मला सामान्य मराठ्यांचा पाठिंबा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.

Advertisement

Advertisement