Advertisement

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे निर्णय

प्रजापत्र | Thursday, 19/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीने विविध निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

 

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य  सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार  (वित्त विभाग) 

महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार (सामाजिक न्याय)

राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार (सहकार व वस्त्रोद्योग) 

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता (ऊर्जा विभाग) 

 इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार (कामगार विभाग)

 बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण (सामाजिक न्याय) 

Advertisement

Advertisement