मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्यांनी सर्वांची माफी देखील मागितली आहे. मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.
त्यांनी लिहलेली सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये ते लिहतात की, महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी, मी सुनील बाबूराव कावळे मु. पो. चिकणगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, असा पत्ता त्यांनी या पत्रामध्ये लिहला आहे.
एकच मिशन, मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा...
साहेब आता कोण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही.ऑक्टोबर २४ हा मराठा आरक्षण दिवस, या मुंबईमध्येच.. आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं नाव तोंडातून काढू नका. आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी या मुंबईमध्ये उपोषणाला बसू.
ऊठ मराठा जागा हो...पण लक्षात ठेवा, शांततेत यायचंय... शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील, पण आता एकच मिशन मराठा आरक्षण...मला वाटलं, मी केलं... मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो सर्वांनी मला माफ करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.