Advertisement

धारुरमध्ये पुन्हा १४ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 19/10/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.१९ (वार्ताहर) - धारुर येथील जाधव गल्लीतील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलाचा लातूर येथे डेंग्यूची लागण होवून उपचार सुरु असताना निधन झाले. या घटनेमुळे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.

 

धारुर तालुक्यातील आरणवाडी येथील मुळ रहिवासी असलेले बजरंग माने हे शहरातील कसबा विभागात जाधव गल्लीत सध्या निवासी आहेत. बजरंग माने यांच्या ओंकार उर्फ दादू (वय-१४) या मुलास गेल्या काही दिवसांपासून तापीची लागण झाली. खाजगी दवाखान्यात उपचारानंतर त्या मुलास येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती ढासळत असल्याने त्यास लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मुलास डेंग्यू झाल्याची चर्चा आहे. दि.१८ ऑक्टोबर २०२३ बुधवार रोजी उपचार सुरु असताना रात्री त्याचे निधन झाले. ओंकार हा येथील जनता माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनामुळे धारुर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement