मराठी चित्रपट, नाटकसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार २०२३ जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरस्कार जाहीर होताच चाहत्यांनी दामले यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी दामले यांना नाट्यसृष्टीतील आणखी एका प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून दामले यांच्याकडे पाहिले गेले आहे. दामले यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
येत्या पाच नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बातमी शेअर करा