महाराष्ट्रात विविध ठिकाणी आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातून मान्सून माघारी गेला असला तरी गेल्या २४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. याशिवाय येत्या 24 तासांतही विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बातमी शेअर करा