एकीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची निवडणूक आयोगासमोर परिक्षा सुरू असतानाच राज्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांचाच होता असा आरोप भुजबळांनी केल्यानंतर पवारांनाही त्याला जोरदार प्रत्यूतर दिले आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नचं राहणार अशी तिखट टिकाही शरद पवारांनी केली.
काय म्हणाले शरद पवार?
छगन भुजबळांच्या आरोपांवर उत्तर देताना शरद पवार यांनी "आमच्यातील काही लोकांचा भाजप सोबत जाण्याचा आग्रह होता, मात्र त्यास आमचा विरोध होता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव भुजबळांचाच होता. असे म्हणत छगन भुजबळ यांनीच खोटे बोलत असल्याची कबुली दिली आहे..." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तसेच "छगन भुजबळ काहीही बोलतात, त्यांना फार महत्व देवू नका, ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत? मात्र निवडून आल्यावर ते भाजपसोबत जातात. त्याबद्दल काय बोलायचं," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
अजित पवारांवर टीका...
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरुन टीका केली. "अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नचं राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लिहलेल्या पत्रावरुनही त्यांनी खोचक टीका केली. युएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहले तरी हरकत नाही..." असे शरद पवार म्हणाले.