बीड दि.९ (प्रतिनिधी)-येथून जवळच असलेल्या तळेगाव शिवारात मागील काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरु होता.याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक संजय तुपे यांना काल (दि.८) दुपारी मिळाल्यानंतर या ठिकाणी त्यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत छापा मारून तब्बल १४ जणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी ३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तळेगाव शिवारात गणेश खाडे यांच्या मालकीच्या शेतात आकाश जयसिंग कंडेरे हा मागच्या काही दिवसांपासून जुगार अड्डा चालवित होता.याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारता असता आकाश कंडेरे,विशाल काळवने,अमोल जाधव,शेख नासेर शेख नाझेर,अकबर काझी अन्वर काझी,राम बंडू चित्रे,नवनाथ मुरलीधर दोडके,गणेश खाडे,आमेर शेख ईलियास शेख,आदित्य यादव गायकवाड,संजय बोबडे,शावेज खान जफरखान,अमोल माने,शेख आमजद शेख समद यांना ताब्यात घेण्यात आले.यावेळी पोलिसांनी ७ दुचाकीसह ३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सिदधेश्वर मुरकुटे, हनुमान खेडकर, तुळशिराम जगताप, कैलास ठोबरे, विकास राठोड, राहुल शिंदे,भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके गणेश मराडे यांनी केली.