मुंबई - शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती.. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रकरण सारखंचं असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर शुक्रवारी (दि.१३) रोजी एकत्रित सुनावणी घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं..
बातमी शेअर करा