मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, असे म्हणत विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस पाठवली आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी नोटीस बजावली होती. शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत शिल्लक आहे.
बातमी शेअर करा