बीड दि. ८( प्रतिनिधी) :जुन्या पिढीतील,डॉक्टर कलंत्री परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉक्टर चंदुलालजी कलंत्री (तेलगाव) यांचे रविवारी (दि. ८) सायंकाळी वयाच्या अल्पशा आजाराने आज् मंत्री कॉलनी स्थित राहत्या घरी निधन झाले.
ते १०० वर्षांचे होते. आपल्या शतायुषी जीवनात डॉ. चंदुलाल कलंत्री यांनी हजारो रुग्णांना सेवा दिली. दर वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दम्यावर हजारो मोफत औषधी देण्याचे कार्य ते गेल्या ५० वर्षा पासून अविरतपने करत असत. ते शेतीनिष्ठ शेतकरी होते.सामजिक, धार्मिक वृत्ती चे होते. त्यांच्या पश्चात, मुलेॲड. जयप्रकाश , डॉ. सुरेन्द्र, विनोद, मनमोहन, दोन मुली, जावई, नातू, पणतू आहेत. त्यांच्या जाण्याने कलंत्री परिवार , नातलग, स्नेही, मित्र परिवार पोरका झाला आहे.त्यांचा अंत्यविधि आज (दिनांक ९ ) सोमवारी सायंकाळी पाच वाजता, तेलगाव येथील त्यांच्या निवासस्थानी "राय जगन्नाथ कॉम्प्लेक्स"येथून निघेल. त्यांच्या शेतात सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत.