Advertisement

शासकीय कर्मचाऱ्यांचे होणार जातीनिहाय सर्वेक्षण

प्रजापत्र | Saturday, 30/09/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल ओबीसी समाजाच्या बैठकीत सादर केला. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. याचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समाजातील विविध घटकांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. यातच राज्यातील मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे आरक्षण 27 टक्के आहे. असे असले तरी शासकीय नोकऱ्यांध्ये ओबीसी समाजाचे प्रमाण 7 ते 8 टक्केच आहे. याच मुद्यावर उपमुख्यंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली. अजित पवार यांना ही आकडेवाकरी मान्य नव्हती त्यामुळे महाराष्ट्रात शासकीय सेवेत कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणामुळे कोणत्या प्रवर्गातील किती लोक शासकीय सेवेत आहेत याची आकडेवारी समोर येणार आहे.

Advertisement

Advertisement